Our Centers

Blog Details

पहिल्या बाळाला DOWN SYNDROME हा जन्मजात आजार असल्याने झालेला मानसिक त्रास व आधुनिक तंत्रज्ञान वापरून झालेलं दुसरं निरोगी व सुदृढ बाळ !


           आपलं बाळ सुदृढ ,हुशार,निरोगी असावं असं कुणाला बरं वाटत नाही? हो!! आम्ही देखील अगदी अशाच बाळाची नऊ महिने स्वप्न पाहत होतो. लग्नाच्या अगदी २ वर्षांनीच आम्हाला बाळाची चाहूल लागली. कितीतरी वर्षांनी घरात पुन्हा पाळणा हलणार होता. मला गर्भधारणा झाल्यावर उत्तम आहार, देवाचे नामस्मरण, पुस्तकांचे वाचन सर्वच सुरु झाले होते. माझे मिस्टर,सासूबाई ,सासरे,नणंद सगळीकडूनच काळजी व कौतुक चालूच होते. कोणत्याच गोष्टीची मला कमी नव्हती. नऊ महिने मजेत गेल्यावर माझा मुलगा शार्दूलचा जन्म झाला. घरात एकच आनंद पसरला. बाळाच्या येण्याने प्रत्येकजण आनंदी होता. घराचं आता गोकुळ झालं होत.
             बाळाच्या देखभालीमध्ये कसलीच कसर आम्ही ठेवली नव्हती. दिवसांमागुन दिवस जात होते. शार्दूल वयाने मोठा होत होता पण दुर्दैवाने त्याची मानसिक व शारीरिक वाढ इतर मुलांच्या तुलनेत खूपच कमी व वेगळी वाटत होती. आमच्या सर्वांपेक्षा वेगळाच वाटणारा चेहरा, आखूड मान ,लहान हातपाय , बोलता न येणे, तोंडातून सतत लाळ पडत राहणे,सांगितलेल्या सूचना न कळणे यामुळे मी खूपच अस्वस्थ होत चालले होते. यासर्वांवर उपाय करावा म्हणून आम्ही शार्दुलला CHILD SPECIALIST ला दाखवले. त्यांनी त्याला बघताच शार्दूलता DOWN SYNDROME नावाचा जन्मजात आजार असल्याचे सांगितले. त्याच क्षणापासून आमचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. आपलं एकुलतं एक बाळ !काय झालयं हे त्याच्याशी त्याच्या अशा असण्याला आम्ही दोघच जबाबदार आहोत का? काय असेल त्याचं भवितव्य?  ना ना प्रश्नांनी डोक्यात नुसता भडीमार केला होता.
           शार्दूल आता चांगला १० वर्षाचा झाला होता. पण तो अजूनही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी आमच्यावरच अवलंबून होता. इतर मुलांसारखा खेळू बागडू शकत नव्हता त्याचं आम्हाला खूप दुःख होत होते. आता शेजारची मुले देखील त्याची टिंगल करू लागली होती. काय करावे ?कसे त्याला ह्यातून बाहेर काढावे काहीच समजत नव्हते. शार्दुलच्या अशा असण्याने सगळ्यांनाच PROBLEM वाटायला लागले होते. त्याला सोडून मला काही करता येत नव्हते. बाहेर कुठे जायचे असल्यास ते शक्य होत नव्हतं. स्वतःची हौस-मौज अशी काहीच राहिली नव्हती. आयुष्य अगदी निरस व अर्थहीन झालं होतं. घरातून आता दुसऱ्या बाळासाठी विचारणा सुरु झाली होती. पण माझे मन मात्र काही केल्या तयार होत नव्हते. पुन्हा दुसऱ्या बाळालासुद्धा शार्दूल सारखाच आजार असेल तर मग मी काय करायचे? काही सुचत नव्हते . पुन्हा हेच सगळं घडलं तर? खूप भीती वाटत होती. परंतु शार्दूल सारखे बाळ असून पुढे काहीच भवितव्य दिसत नव्हते. घरातून पण आता खूप दबाव येत चालला होता. शेवटी दुसरा चान्स घ्यावा असे ठरले. परंतु ह्या वेळी मी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊनच प्रेग्नंनसी ठेवायची असा निर्णय घेतला. डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील कुणीच पूर्णपणे बाळ निरोगी असेल याची खात्री देत नव्हते.
            दिवसांमागुन दिवस जात होते . एक दिवस अचानक मला संतती फर्टीलिटी व IVF सेंटर बद्दल समजले. येथे आल्यावर मी डॉ.स्वाती डोंगरे मॅडमना माझ्या पहिल्या बाळाला असलेल्या आजाराबद्दल सांगितले. डॉ.स्वाती मॅडम यांनी मला अगदी प्रेमाने व मायेने आधार दिला. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण जन्मजात आजारमुक्त बाळ कसं मिळवू शकतो याची पूर्ण माहिती मला मॅडमनी दिली. ठरल्याप्रमाणे IVF TECHNOLOGY वापरून आमचे बाळ बसवण्यात  व त्यामध्ये  PGD/PGS TECHNOLOGY वापरून मॅडमनी आधीच तपास करून बाळाला जन्मजात कसलीही विकलंगता /आजार असणार नाही ह्याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे प्रेगनंनसी च्या नऊ महिन्यांमध्ये मॅडमनी मला शारीरिक व मानसिक आधार दिला. माझे दुसरे बाळ आता ३ वर्षांचे आहे. व त्याला कोणत्याही प्रकारची जन्मजात विकृती नाही व ते खूप हुशार,सुधृढ व निरोगी आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून मॅडमनी मला बाळ होण्यापूर्वीच ते सुधृढ असणार ह्याची खात्री दिल्याने मी अगदी निश्चितच होते.
           छोट्या बाळाच्या येण्याने घरातील वातावरण बरेच बदलले आहे. नेहमी होणारा मानसिक त्रास आता खूप कमी झाला आहे . माझे संपूर्ण कुटुंबामध्ये आनंद पसरवणाऱ्या डॉ.स्वाती डोंगरे मॅडम व संपूर्ण स्टाफ यांची मी मनःपूर्वक आभारी आहे.
              
          
                                                                                                                                                                                                       शब्दांकन: डॉ. क्लिटा परेरा