Our Centers

Blog Details

वारंवार गर्भपात होत असल्याने झालेली निराशा व अत्याधुनिक आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाचा वापर करून झालेलं बाळ!

             मी कधी आई बनू शकेन का? माझ्या शरीराची व मनाची जी वाताहत होत आहे ती कधी थांबेल का? माझा बाळासोबतचा प्रत्येकवेळी अर्धवट तुटणारा प्रवास कधीतरी पूर्ण होईल का? अशा असंख्य प्रश्नांनी मानसिक व शारीरिक त्रासाच्या शिखरावर पोहोचलेली मी! का हे सर्व माझ्या सोबतच घडतंय? काहीच कळत नव्हतं. मी सोनाली. १३ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. घरातील सर्वच मंडळी प्रेमळ व मायाळू,कसल्याही प्रकारची मला कमी नव्हती व मानसिक त्रास तर बिलकुलच नाही. आमचं एकत्र कुटुंब! घरातील प्रत्येक लहान मुलांची मी आवडती काकी! मलादेखील मुलांचा खूपच लळा होता. गोकुळासारख्या आमच्या घरात काहीच कमी नव्हते.
            लग्नाच्या अगदी २ वर्षानंतर मला  दिवस गेले. घरातील प्रत्येक जण आपापल्या परीने माझी काळजी घेत होते. खाणं-पिणं अगदी सकस व वेळच्या वेळी चाललं होत. पण म्हणतात ना सुंदर गोष्टींना कोणाची तरी नजर लागावी असंच काहीसं घडलं. तीन महिने झालेले असताना अचानक रक्तस्त्राव सुरु झाला व माझा गर्भपात झाला. घरातील प्रत्येक जण हिरमुसून गेले. मला तर हे दुःख पचवायला देखील कठीण पडू लागले. तरीही मी स्वतःला खंबीरपणे सावरले. ह्या प्रसंगानंतर घरातले अजूनच माझी जास्त मानसिक व शारीरिक काळजी घेत होते.दिवसांमागुन दिवस जात होते. सर्व काही सुरळीत चाललं होतं फक्त बाळाची कमी होती. त्यातच देवांनी माझी ती इच्छा पूर्ण करावी. पुन्हा मला गर्भधारणा झाली. पूर्वीचा अनुभव गाठीशी असल्यामुळे मी आधीच खूप सतर्क होते. अगदी pregnancy test पॉसिटीव्ह आल्या दिवशीच आम्ही डॉक्टरांकडे  धाव घेतली. आम्हांला कोणत्याच गोष्टीचा धोका ह्यावेळी पत्करायचा नव्हता. डॉक्टरांनीदेखील औषध-गोळ्या सुरु केल्या. घरातील प्रत्येक जण मी कशी शारीरिक व मानसिकरित्या खुश राहीन हे बघत होते.सर्वकाही ठीक चालले होते. परंतु पुन्हा एकदा आशेच्या किरणांवर पाणी पडत तसंच झालं. पुन्हा माझा गर्भपात झाला. डॉक्टरांकडे लगेच धाव घेऊनही त्या देखील बाळाला नाही वाचवू शकले.आता तर आम्ही अजूनच खचून गेलो होतो. का हे असं होतंय काहीच कळत नव्हतं. बघता बघता ५ वेळा गर्भधारणा राहूनही बाळ काही हाती आलं नव्हतं. ह्या सर्वातून जाताना आम्ही मानसिकदृष्ट्या खूप खचत चाललो होतो. वारंवार होणाऱ्या गर्भपातामुळे माझी शारीरिक स्थिती देखील खालावत चालली होती. विविध डॉक्टरांकडे ट्रीटमेंट देखील घेऊन झाली. पण प्रत्येकवेळी निराशाच पदरी पडत होती.

              शेवटी माझ्या मैत्रिणीकडून मला संतती फर्टीलिटी सेंटरडॉ.स्वाती डोंगरे या मॅडमबद्दल समजले. डॉ.स्वाती यासाठी उत्तम ट्रीटमेंट करतात हे मैत्रीणीने मला सांगितले. मी थोडाही वेळ वाया न घालवता डॉ. स्वाती मॅडम यांची APPOINTMENT घेतली. आम्ही दोघंही हॉस्पिटल मध्ये पोहोचलो. WAITING  हॉल मध्ये लावलेले बाळांचे फोटो पाहून फार प्रसन्न वाटले. डॉ. स्वाती मॅडम यांना भेटताच मी माझी आतापर्यँतची संपूर्ण व्यथा त्यांना सांगितली. अतिशय मायाळू व प्रेमळपणे त्यांनी माझी समजूत घेतली व ''आपण करू ट्रीटमेंट घाबरू नकोस'' असा मला धीर दिला. त्यांच्या ह्या वाक्यानेच मला खूप धीर आला. मॅडमनी माझी आधीची फाइल पाहिली त्यात काही नसलेले रिपोर्ट्स मला करायला सांगितले. माझे रिपोर्ट्स येताच त्यांनी मला काही रिपोर्ट्स मध्ये अडचण असल्याचे सांगितले. माझ्या शरीरामध्ये वारंवार गर्भपात होण्याची TENDENCYहोती. पण मॅडम म्हणाल्या कि त्यावर आपण उपचार करून अगदी सुधृद बाळ राहू शकतं. सर्व काही योग्य करून आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाद्वारे माझ्या गर्भाशयात बाळ सोडण्यात आले. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ह्यावेळी गर्भपात होऊ नये म्हणून INJECTION ,गोळ्या चालू ठेवल्या व योग्य आहाराचं मार्गदर्शन केले. बघता बघता ९ महिने पूर्ण झाले व शुभमूहुर्त पाहून ऑपेरेशनद्वारे माझी डिलिव्हरी करण्यात आली. मला जुळे मुलगे झाले. बाळांना पाहताच संपूर्ण घर आनंदाने बहरून गेले.
              माझा आनंद तर गगनात मावत नव्हता. बाळाच्या येण्याने आमचं आयुष्य पुन्हा बहरलं आहे. त्याबद्दल मी डॉ. स्वाती डोंगरे मॅडम व त्यांच्या संपूर्ण टीम ची आभार मानते. 
   
                                                                                                                                                                                                                                  शब्दांकन : डॉ. क्लिटा परेरा