Our Centers

Blog Details

मासिक पाळी बंद झाल्यावर देखील अत्याधुनिक आय.व्ही.एफ.तंत्रज्ञान वापरून झालेलं बाळ!

            आजचं अत्याधुनिक व प्रगत झालेलं तंत्रज्ञान हे माझ्यासारख्या असंख्य महिलांना वरदानचं ठरत आहे. कधीही विचारदेखील न केलेली गोष्ट ह्याच तंत्रज्ञानामुळे  माझ्या आयुष्यात घडली व माझे स्वप्न पूर्ण केले ते म्हणजे डॉ. स्वाती डोंगरे मॅडम व त्यांच्या संतती फर्टीलिटीच्या टीमने !
               मी सविता, माझे वय ५० वर्षे आहे. वयाच्या २८ व्या वर्षी माझे लग्न झाले. लग्नानंतर अगदी काही महिन्यातच मला बाळाची चाहूल लागली. परंतु काय घडले काहीच कळेना ७ महिने बाळ पोटात वाढून अचानक असे समजून आले कि बाळ आतल्या आत मृत झाले आहे. माझ्या मनावर ह्या गोष्टीचा अतिशय मोठा आघात झाला. ह्यातून सावरता सावरता २-३ वर्षे निघून गेली होती. प्रत्येक वेळी बाळाचा विचार केला कि असे वाटायचे कि पुन्हा असाच प्रकार घडला तर मी स्वतःला सावरू शकेन का? दिवसामागून दिवस जात होते. आता मात्र माझी बाळाची ओढ तीव्र होत चालली होती.आता पुन्हा आपण बाळाचा विचार करू असे आम्ही ठरवले. परंतु बरीच वाट पाहूनदेखील गर्भधारणा राहत नव्हती. म्हणता म्हणता आमचे वय ३५ पार करून गेले होते. आता घरातील मंडळी, नातेवाईक सर्वच ठिकाणाहून कडू बोलणे व टोमणे ऐकू येऊ लागले होते. आम्हला देखील बाळ पाहिजे होत. पण यश तर काही येत नव्हते. शेवटी आम्ही बाळासाठी उपचार करायचे असा निर्णय घेतला. आमची ट्रीटमेंट एका प्रख्यात स्त्रीरोगतज्ञांकडे सुरु झाली. आमचे दोघांचे सर्वकाही रिपोर्ट्स करण्यात आले. दर महिन्याला follicular  study केली जात होती. औषध उपचार चालू होते परंतु काहीच उपयोग होत नव्हता. प्रत्येक महिन्याला फक्त निराशा पदरात पडत होती. म्हणता म्हणता रिपोर्ट्स व ट्रीटमेंटच्या २-३ मोठ्या फाईल जमा झाल्या. परंतु बाळ काही राहत नव्हते. एवढं करूनदेखील काहीच उपयोग होत नसल्याने आम्ही पूर्ण ट्रीटमेंट बंदच केली. आता वय देखील ४०वर्षे पार करून गेले होते. आपण आता कधीच आई बनू शकत नाही. अशी मी मनाची तयारीच केली होती.पचवायला कठीण असलं तरी ते सत्य आहे हे मी जाणून घेतले होते.बाळाशिवाय घराला घरपण नव्हेच. दोघचं स्वतःच आयुष्य कसंबसं ढकलत होतो. वयाच्या ४८व्या वर्षी माझी मासिक पाळी बंद झाली. व मनात होती ती पूर्णच आशा मावळली होती. माझा स्त्रीचा जन्म बाळाविना व्यर्थच आहे असे मला सारखे वाटायचे. जीवन अगदी अर्थहीन व निरस झाले होते.
            एकेदिवशी नेटवर संतती फर्टीलिटी आय.व्ही.एफ सेंटर बद्दल समजले. ''पण आपली पाळी बंद झाल्यावर बाळ कसे होईल ? नाही हे शक्य नाही!'' हा विचार करून मन हिरमुसले परंतु एकदा जाऊन यावे असे आम्ही ठरवले. आम्ही दुसऱ्याच दिवशी संतती फर्टीलिटी सेंटर मध्ये पोहोचलो. तिथे विविध वयातील आई व बाळांचे फोटो पाहून फारच प्रसन्न वाटले. शेवटी आम्ही दोघे डॉ.स्वाती डोंगरे मॅडम ह्यांना भेटलो. त्यांना पहिल्याच वाक्यात माझी पाळी बंद झाली आहे तर मला बाळ होईल का हे विचारले? त्यांनी मला खूपच आधार दिला व नैसर्गिकरित्या कसे बाळ राहते ते समजावून सांगितले. तसेच आय.व्ही.एफ.बद्दल माहिती दिली.अगदी त्याच दिवसापासून माझ्यावर औषधोपचार  सुरु झाले. माझी बंद झालेली मासिक पाळी त्यांनी पुन्हा सुरु केली. सर्व तपास व उत्तम उपचार करून वयाच्या ४९ व्या वर्षी माझ्या गर्भपिशवीत IVF तंत्रज्ञान वापरून बाळ सोडण्यात आले. अगदी अशक्य व नवल वाटणारी अशी हि घटना आम्हां सर्वांसाठीच होती. मॅडमचे प्रयत्न व त्याला दैवाची जोड मिळावी तशी माझी गर्भावस्था अगदी उत्तम व सुखकर ठरली. ९ महिने योग्य औषध उपचार,आहार,मार्गदर्शन व मानसिक आधार ह्या सर्वांच्या जोरावर ५ महिन्यांपूर्वी मला मुलगा झाला. तो देखील वयाच्या ५० व्या वर्षी.   
             बाळाच्या येण्याने आम्ही सर्वजण आनंदाने बहरुन गेलोय. डॉ.स्वाती डोंगरे मॅडम व टीम यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. देव त्यांना उत्तम आरोग्य, यश, कीर्ती देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना !


                                                                                                                                                                                   शब्दांकन : डॉ. क्लिटा परेरा