Our Centers

Blog Details

IVF Treatment

                             

कित्येक जोडप्यांसाठी आयवीएफ (IVF) ट्रिटमेंट एखाद्या चमत्कार किंवा वरदानापेक्षा कमी नाही. कारण जी स्त्री आई होऊ शकत नाही तीच्या मनातील हुरहूर किंवा यातना ह्या तिलाच माहित असतात! पण आताचं जग आणि तंत्रज्ञान फार विकसित झालं आहे त्यामुळे आता   IVF या अत्याधूनिक ट्रिटमेंटमुळे स्त्रीला मातृत्वही भोगता येतं आणि आई झाल्याचा आनंदही ..
       आई होणे, आपल्याला एक गोंडस बाळ असणे आपण त्याला वाढवून मोठे करणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. पण काही स्त्रिया या नैसर्गिकरित्या गरोदर राहू शकत नाही. जेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हतं तेव्हा यावर काही उपाय नव्हता. अशावेळी स्त्रीया मुलं दत्तक घेण्याला प्राधान्य द्यायच्या. पण त्यातून स्वत:च्या गर्भात बाळ वाढण्याची भावना मिळायची नाही. पण जसं जसं तंत्रज्ञान वाढलं तसं तसं या समस्येवर संशोधन केलं जाऊ लागलं आणि शेवटी शास्त्रज्ञांनी चमत्कार घडवत नैसर्गिकरित्या आई होऊ न शकणाऱ्या स्त्रियांना सुद्धा आई बनवण्याच्या उपचाराचा शोध लावला. ती उपचार प्रक्रिया म्हणजे आयवीएफ (IVF) होय.

आयवीएफ म्हणजे इन विट्रो फर्टिलाइजेशन होय, या प्रक्रियेमध्ये महिलेच्या अंडाशयातून बीज घेऊन त्याला विर्यासोबत फर्टिलाइज केले जाते. हि प्रक्रिया जगभरातील असंख्य जोडप्यासाठी वरदान ठरत आहे.

आईवीएफ का केली जाते?


स्त्रिया नैसर्गिकरित्या गरोदर न राहण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जर फेलोपीयान ट्यूब ब्लॉक किंवा डॅमेज असेल, पुरूषामध्ये स्पर्म काउंट कमी असेल, स्त्रीला ओवूलेशनची समस्या असेल, प्रिमेच्युर ओवेरीयन फेल्युअर वा गर्भाशयात समस्या असले तरी गरोदर राहण्यात अडथळा निर्माण होतो. याशिवाय ज्या स्त्रियांच्या फेलोपियन ट्यूब काढून टाकली आहे किंवा त्या कोणत्या अनुवांशिक विकाराने ग्रस्त असतील व हया सारख्या असंख्य समस्या ज्या मुळे बाळ राहण्या मध्ये अडचण येत असल्यास आयवीएफ तंत्रज्यानाचा  वापर वरदान ठरत आहे.