Our Centers

Blog Details

शुक्र कमी म्हणून माझा झालेला अपमान ! व त्यावर मात करून मला झालेलं बाळ !!

  आपलं बाळ !!!अगदी कल्पना करूनच किती छान वाटतयं  ना? मनाला अगदी आनंद होतोय ना ? पण हा आनंद कधी माझ्या नशिबी असेल का ? का हे सगळं माझ्यासोबतच होतंय ? का हे सगळं दुःख माझ्याच नशिबी आलयं ?

    मी विजय ! एक मध्यमवर्गीय माणूस. लग्नाला १० वर्षे झालीत. पहिली २-३ वर्षे अगदी छान हसत खेळत गेली. मग मात्र बाळाचे वेध लागले अजून एखादे वर्ष नैसर्गिकरित्या बाळाची वाट पाहण्यात निघून गेले पण त्यात काही यश आले नाही. त्यानंतर मात्र घरातून आई ,वडील ,पाहुणेपैक, मित्रमंडळी या सर्वच स्थरातून बाळाची चौकशी सुरु झाली. बायकोला देखील अनेक टोमणे ऐकायला लागत होते. म्हणून तिने अगदी माझ्या मागे तगच धरला. आपण आता बाळासाठी औषध उपचार सुरु करू यासाठी हट्ट धरला. मी देखील अगदी सहजपणे हो बोललो. व या दिवसापासून आमची दवाखान्याची वारी सुरुच झाली. तरीही मी अजूनही निश्चितंच होतो.

        ठरल्याप्रमाणे आम्ही दोघे डॉक्टरांना भेटलो. सर्व सामान्य तपास झाल्यावर दोघांचेही रिपोर्ट्स करावे लागतील असे डॉक्टरांनी सांगितले. दोघांचे ही रिपोर्ट्स केले गेले. बायकोचे सर्व रिपोर्ट्स अगदी नॉर्मल होते. अरे!! पण हे काय? माझ्या रिपोर्ट्सबदल सांगतच माझ्यापायाखालची जमीनच सरकली .माझ्या रिपोर्ट्स नुसार माझ्या शरीरामध्ये शुक्राची संख्या फारच कमी झाली होती. हे ऐकताच माझे डोके अगदी बधिर झाले. मनात एकदाच धस्स झालं .दोन मिनिटं बायकोच्या नजरेला नजर मिळवायची देखील हिंमत झाली नाही. डोळ्यात अगदी अश्रू तरळले .पण काय करणार पुरुष आहे ना? रडू तर शकत नाही. खंबीर तर असावचं लागतं .काही क्षणांतच खोटं का असेना स्वतःला सावरून डॉक्टरांना पुढचा प्रश्न केला.

        डॉक्टर काय करता येईल ह्यासाठी? डॉक्टर म्हणाले, तीन महिन्यांची औषध देतो व त्यानंतर पुन्हा एकदा रिपोर्ट करू. अगदी दुःखी मनाने औषधं लिहिलेला कागद उचलला व कॅबिनच्या बाहेर आलो. त्याच क्षणापासून आयुष्याने वेगळ वळण घेतलं .सतत मनामध्ये कमीपणाची भावना, लाजिरवाणेपणा, माझ्यामुळे माझ्या बायकोला आई होण्याचं सुख मिळत नाही.  ह्या सगळ्या गोष्टींचा मनामध्ये भडीमार होत होता .

       घरी पोहचलो. नेटवर शोधून विविध आहार ,व्यायाम , देवाचे नामस्मरण सर्व काही चालू केले. ३ महिने अगदी न चुकता हे सर्व काही करत होतो. सर्व काही आता नॉर्मल झाले असेल ह्या आशेवर पुन्हा डॉक्टरकडे येऊन पोहोचलो .डॉक्टरांशी बोलणं झालं व पुन्हा एकदा माझे रिपोर्ट्स करण्यात आले. आता तरी सर्व नॉर्मल असावं अशी मनोमन देवाकडे प्रार्थना करत होतो. पण का कुणास ठाऊक ! दैव माझ्यासोबत नव्हते. थोड्या फार फरकाने शुक्राची संख्या पूर्वीसारखी दाखवली होती. जागलेली आशा पुन्हा एकदा मावळली. ह्या सगळ्यातून जाताना मी स्वतः स्वतःच्या नजरेतून उतरत होतो. माझ्यामुळे माझ्या बायकोला 'आई ' होता येत नाही ह्याचे मनोमन दुःख प्रत्येक क्षणी मला बोचत होते.

       त्यानंतर आम्ही अगदी ३-४ वेगवेगळे डॉक्टर्स बदलले. पण जिथे जाईन तिथे तुमच्या मध्ये शुक्राचे प्रमाण कमी आहे व ते वाढल्याशिवाय तुम्हाला बाळ होणार नाही. हेच ऐकू येत होतं .आता हि गोष्ट घरातील मंडळी, जवळचे मित्र सर्वांनाच कळली होती. वैयक्तिक जीवनातही बायकोसोबत बरेच खटके उडू लागले होते.  या सगळ्यातून मी मात्र दिवसेंदिवस खचतच चाललो होतो. प्रत्येक जण काही ना काही उपाय सुचवत होता. वेगवेगळ्या डॉक्टर्स ची नावं सुचवत होता. आणि मी मात्र कावराबावरा होऊन ते सर्वच करत फिरत होतो. पण काहीही परिणाम दिसत नव्हता. परिणामी मी दिवेसंदिवस खचतच चाललो होतो. शेवटी सर्वकाही दैवाच्या नावे सोडून देऊन सर्वच उपचार बंद करावी असा मी निर्णय घेतला. दिवसांमागुन दिवस जात होते. मी मात्र अपमान, लाजिरवाणेपणा ह्यांच्या ओझ्याखाली दबत चाललो होतो. 

        पण म्हणतात ना,'प्रत्येक दुःखाला एक सुखाची किनार कधीना कधी सापडतेच'. माझ्या बाबतीतही ही किनार सापडली ती म्हणजे संतती फर्टीलिटी व IVF सेंटरद्वारे.

      एकदा सहजच घराबाहेर पडलो होतो व रस्त्याच्या कडेला असलेले शिबिराचे बॅनर वाचले. 'बाळासाठी प्रयत्न करताय? बाळ होत नाही ये?' हे वाचल्यावर का कुणास ठाऊक मनात एक आशा जागवली. शेवटचा प्रयत्न म्हणून शिबिराला जाऊ असे बायकोला घरी येऊन सांगितले. ठरल्याप्रमाणे शिबिराला पोचलो

      रिपोर्ट्स डॉक्टरांच्या समोर ठेवल्यावर मी स्वतःहूनच म्हणालो ,डॉक्टर साहेब मी बरीच ट्रीटमेंट केली आहे... बायकोचे सर्व रिपोर्ट्स चांगले आहेत परंतु माझ्यामध्ये शुक्राचे प्रमाण कमी आहे व त्यामुळे मला बाळ होत नाही आहे. डॉक्टरांनी रिपोर्ट्स पाहिले व म्हणाले अहो विजय साहेब ,कोण म्हणतं शुक्र कमी आहेत. एवढ्या शुक्रांमधून तुम्हाला तर १० लाख बाळ होऊ शकतात. बोला तुम्हाला किती पाहिजेत?? हे ऐकल्यावर मी अगदी अचंबित झालो. माझा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन पूर्णच बदलला. मन आनंदित झाले. मी विचारल्यावर मला IVF म्हणजे काय असतं, बाळ कस राहत ? ह्या बद्दलची सर्व माहिती अगदी विस्तृतपणे सांगितली. हे ऐकून मी आनंदाने घरी परतलो. ती रात्र मी अगदी निवांत झोपलो. दुसऱ्याच दिवशी ठरल्याप्रमाणे संतती फर्टीलिटी व IVF सेन्टरमध्ये दाखल झालो.      

      इथे आल्यावर मी डॉक्टर स्वाती डोंगरे  मॅडम ह्यांना भेटलो. त्यांनी तर तुम्ही बाळ इथूनच घेऊन जाणार हा विश्वास दाखवला. ह्याच दिवसापासून माझ्या आयुष्याला वेगळेच वळण आले. प्रत्येक VISIT ला मी डॉक्टरांना भेटायचो .माझ्यातील आशेचा किरण वाढतच चालला होता. सर्व काही समजावून सांगून डॉक्टर स्वाती डोंगरे व स्टाफने IVF TREATMENT द्वारा मला स्वतःच हक्काचं बाळ मिळवून दिलं. जे स्वप्न मी अनेक वर्षे फक्त स्वप्न म्हणूनच पाहत होतो ते माझं सत्यात उतरलं होतं.

     मी बाप बनलो ! ''हो माझ्या स्वतःच्या हक्काच्या बाळाचा मी बाप बनलो". माझ्या सारख्या लाखो करोडो लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर स्वाती डोंगरे मॅडम व संपूर्ण टीम यांचे मी आयुष्यभर ऋणी राहीन.

धन्यवाद !!!!

 शब्दांकन: डॉ. क्लिटा परेरा